लातूर: भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लातुरमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर आरोप केले होते. देशमुख परिवाराने जिल्ह्यातील साखर कारखाने गिळंकृत केले आहेत. ३१ डिसेंबर पूर्वी अमित देशमुख आणि संबंधित साखर कारखाने लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीच्या कारवाई सुरू होतील, असेही सोमय्या म्हणाले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राडारवर सध्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते असल्याचे दिसते. अनेक नेत्यांवर तसेच मंत्र्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे अनेकांना ईडीच्या चौकशीला देखील सामोरे जावे लागले आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांनी कॉंग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्याच सोबत त्यांच्यावर कारवाई देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी मांडलेले मत हे राजकीय विधान असून जनतेला काय आहे ते सर्व माहित आहे. सर्व जनते समोर आहे. त्यांच्या साक्षीने आहे, त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अमित देशमुख यांनी एकप्रकारे किरीट सोमय्या यांची खिल्लीच उडवल्यासारखे केले आहे. अमित देशमुख हे लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड इथल्या श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
- अजित पवारांचं मोठं वक्तव्य; एसटीच विलीनीकरण केलं तर उद्या…
- श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या टीमसोबत खेळणार?
- ‘भावना गवळी तुमच्या घोटाळ्यांची शिक्षा तुमच्या आईला देऊ नका, ईडी समक्ष हजर व्हा’
- …म्हणून बिनविरोध निवडणुका झाल्या; अजित पवारांनी केला खुलासा
- महाराष्ट्रातील रामपथ यात्रा ट्रेनला दाखवण्यात आला ग्रीन सिग्नल, पुण्याहून जाणार अयोध्येला