fbpx

अमीर खान आणि लता मंगेशकरांनी केली पूरग्रस्तांना मदत

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तर अनेक सिने-कलाकारांनी देखील या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केले आहे. आता बॉलीवूड अभिनेता अमीर खान यानी देखील पूरग्रस्ताना मदत केली आहे. तर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ही मदत केली आहे.

मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी अभिनेता अमीर खान आणि गायिका लता मंगेशकर यांनी काही रक्कम जमा आहे. लता मंगेशकर यांनी 11 लाखांची तर आमिरने 25 लाखांची मदत केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्यां दोघांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आदरणीय लतादीदी मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे!

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.