विरोध ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला नव्हे तर यशराज फिल्म्सच्या दादागिरीला-मनसे

हिंदी सिनेनिर्मात्यांच्या दादागिरीला आमचा विरोध ; 'देवा' वादावर मनसेचे स्प्ष्टीक्ररण

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटावरून चालू असलेला वाद आता थेट राजकारण्यांच्या पटलावर येऊन ठेपला आहे. ‘देवा’ हा मराठी सिनेमा प्राईम टाईम ला दाखवण्यासाठी मनसे आग्रही आहे. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मात्र थेटर मालकांची बाजू घेत आपला पाठींबा ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला दर्शिवला आहे. हे सर्व एकीकडे चालू असताना आता मनसेनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा विरोध ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला नसून यशराज फिल्मच्या दादागिरीला असल्याच स्प्ष्टीकरण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिले आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहेत.

आम्ही काल केलेल्या विरोधानंतर आम्ही ‘टायगर जिंदा है’च्या विरोधात आहोत असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण तसं नाही आहे. हिंदी सिनेनिर्मात्यांच्या दादागिरीला आमचा विरोध आहे अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. तर पाच मधील दोन शोज देवाला मिळावे अशी मागणी अंकुश चौधरी यांनी केली आहे. जर ही मागणी पूर्ण केली नाही तर खळ्ळखट्ट्याक केलं जाईल असंही ते म्हणाले.