fbpx

भारतावर यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड दम

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि भारतीय उपखंडातील तणाव वाढू नये याची दक्षता घ्यावी. भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तानने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे. पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने दिली.

पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाविरोधात कारवाई करण्याचे एकप्रकारे निर्देशचं अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज असल्याचं देखील या अधिकाऱ्याने म्हटले आहे.