अमेरिकेचा पाकिस्तानला ‘दे धक्का’

donald trump

वेबटीम : पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी देण्यात येणारा निधी अमेरिकेकडून रोखण्यात आला आहे. हे पाऊल उचलून अमेरिकेने पाकिस्तानला जबरदस्त आर्थिक धक्का दिला आहे. यंदाच्या वर्षात पाकिस्तानला दहशतवाद रोखण्यासाठी निधी दिला जाणार नाही, असे पँटागॉनने म्हटले आहे. दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई न केल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

सुरक्षा सचिव जिम मॅटिस यांनी अमेरिकेच्या संसदेला पाकिस्तानकडून दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. यावेळी हक्कानी नेटवर्कविरोधात पाकिस्तान ठोस कारवाई करत नसल्याचे मॅटिस यांनी सभागृहाला सांगितले. यानंतर पाकिस्तानची आर्थिक रसद तोडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. अमेरिका दरवर्षी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी मोठा निधी देते. मात्र या निधीचा योग्य विनियोग करुन हक्कानी नेटवर्कविरोधात समाधानकारक कारवाई केली नसल्यामुळे पाकिस्तानला यंदा हा निधी देणार नसल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.