fbpx

लष्करी हल्ला करायचा असेल तर दहशतवाद्यांवर करा, अमेरिकेने पाकिस्तानला झापले

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे दहशतवादी तळावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारताला उत्तर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र पाकिस्तानला लष्करी हल्ला करायचाच असेल तर आधी दहशतवाद्यांवर करावा, म्हणत अमरिकेने झापले आहे.

काल पहाटे पुलवामा सीआरपीएफ हल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याकडून थेट पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचं कंबरड मोडण्यात आलंं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र संपूर्ण जगभरातून भारताचे समर्थन केले जात असून पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देवू नये, असे सांगितले जात आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्याकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये संरक्षणसंदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्याशी देखील पोम्पिओ यांनी चर्चा केली आहे.