अमेरिकेकडून पाकिस्तानला एफ-16 विमानांचा वापराबाबत विचारला जात आहे जाब

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने देखील एफ-16 फायटर जेटस विमानांचा वापर करत भारताच्या सीमालगत भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सतर्क लष्कराने त्यांचा हा डाव हाणून पाडला तर पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेल्या एफ-16 विमानाचा देखील भारताकडून चुरा करण्यात आला. तर आता अमेरिकेकडून पाकिस्तानला एफ-16 विमानांचा वापराबाबत जाब विचारला जात आहे. पाकिस्तानने अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचा भंग करत भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर केला आहे.

दरम्यान भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना भारताने पाकिस्तानचे एक एफ-16 विमान पाडले; पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नव्हता. अखेर गुरूवारी भारताने पाडलेल्या एफ-16 विमानाचे अवशेष पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा आता समोर आला आहे. त्यामुळे अमेरिका आता पाकिस्तानवर दबाव टाकत असून एफ 16 वापरा बाबत उत्तर मागत आहे.