अमित शहा लिहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते विनय सहस्त्रबुध्ये यांनी दिली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी शहा यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती दिली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या झंजावती कारकिर्दीत ‘सुरतची लुट’ हे अत्यंत महत्वाचे असे प्रकरण आहे.आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज हे सुरत लुटणारे असंच चित्र रंगवण्यात आलं आहे तसेच  या बद्दल अनेक समज गैरसमज देखील पसरले आहेत . महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा यासाठी  शहा हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली सहा महिने अभ्यास करत असून गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा. विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

 

You might also like
Comments
Loading...