आ.मेधा कुलकर्णींच्या मुलाने केली मराठा आंदोलकांना अरेरावी, आंदोलकांचा आरोप

पुणे : आमदारांच्या घरासमोरील मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन म्हणजे ‘स्टंट’ असल्याचे वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते, यानंतर आता कुलकर्णी यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जात आहे. याच दरम्यान आ कुलकर्णी यांच्या  मुलाने आंदोलकांना अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान  मराठा क्रांती मोर्चाकडून आमदारांच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणे आ मेधा कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता दिसत आहे, मराठा क्रांती मोर्चाकडून आज सकाळी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तर आता आंदोलन दरम्यान त्यांचे मुलाने आंदोलकांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.मराठा क्रांती मोर्चाकडून आमदारांच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणे भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता दिसत आहे, कारण आ कुलकर्णी यांच्या वक्तव्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्याअसून आज सकाळी त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य आ मेधा कुलकर्णी यांनी केलं होत. आज कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन केले जाणार होते. याबद्दल त्यांना विचारलं असता ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं.

नेमकं काय म्हणाल्या आ मेधा कुलकर्णी

शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया आ मेधा कुलकर्णी यांनी दिली होती.

आमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्या विरोधात मराठा संघटना आक्रमक, घरासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी