वाळूजमध्ये रुग्णवाहिकेचा स्फोट, कुठलीच जीवितहानी नाही

औरंगाबाद : पूणे-औरंगाबाद महामार्गावर वाळूजनजीक गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता तर चालकाने प्रसंगावधान दाखवून लगेच उडी मारल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, काही वेळातच रुग्नावाहीकेचा स्फोट झाला.

चालत्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतल्यामुळे चालकाने प्रसंगावधानाने वाळूज येथील पुलावर रुग्णवाहिकेला थांबवत बाहेर पडला त्यानंतर रुग्णवाहिका पूर्ण आगीच्या विळख्यात गेली. आग वाढत असतानाच रुग्णवाहिकेचा अचानक स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की, 40 ते 50 फूट आकाशात रुग्णवाहिकेचे तूकडे गेले स्फोटानंतर रुग्णवाहिकेच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या झाल्या.

या गोष्टीची माहिती पोलीस तसेच अग्निशमन दलाला देण्यात आली काही वेळातच तिथे पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिके तू न मिळत असलेली आग तात्काळ आटोक्यात आणली तसेच रुग्णवाहिकेचे विखुरलेले तुकडे गोळा करण्यात आले रुग्णवाहिकेला आग कशी लागली तिचा स्पोर्ट कसा झाला याचा तपास पोलीस करत आहे रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज काहींनी व्यक्त केला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

महत्वाच्या बातम्या