पुणे: मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या नदी सुधार योजनेला मिळणारे अनुदान परत जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेसाठी निविदा प्रक्रिया, भूसंपादनासह अन्य सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या महिनाभराच्या मुदतीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यास पुणे महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळेपुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला (Jaika Yojana) फटका बसला आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत मुळा-मुठा नदी प्रकल्पांना मान्यता दिली होती. या प्रकल्पासाठी जपान स्थित जायका कंपनीने ९८५ कोटींची आर्थिक मदत केंद्र सरकारला केली होती. ही मदत अनुदान स्वरुपात महापालिकेला दिली जाणार आहे. चार वर्षांपूर्वी ही योजना मान्य करण्यात आली.मात्र काही न काही कारणांनी ती रखडत गेली. त्यामुळे या योजनेचा खर्च १ हजार ५०० कोटींवर पोहोचला असून हा अतिरिक्त खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
दरम्यान दहा डिसेंबर रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नवी दिल्ली येथे योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेला एक महिन्यांचा अवधी दिला होता. त्यानंतरही महापालिकेला निविदा प्रक्रिया राबविता आलेली नाही. दरम्यान पाच वर्षांत ही योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करार केंद्र सरकार आणि जायका कंपनीमध्ये करण्यात आला होता. आणि आता या कराराची मुदत जानेवारी महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र फक्त निविदा प्रक्रियेपर्यंत ही योजना पोहोचली आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या योजनेसाठी भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून २६ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यातून ८.९१ हेक्टर भूसंपादन होणे अपेक्षित होते.मात्र प्रत्यक्षात १.२४ हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहेत. विशेष म्हणजे संपादित झालेल्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र हे महापालिकेच्या मालकीचे आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९.६० हेक्टर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. त्यापैकी ०.२३ हेक्टर ही महापालिकेच्या मालकीची मोकळी जागा आहे. वारजे, वडगाव खुर्द, मुंढवा येथील प्रकल्पांसाठी प्रक्रिया राबवून सुमारे ४२ हजार ३२८.५५ चौरस मीटर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.दरम्यान या योजनेत ११ सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे निधी परत जाण्याचीही शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<