जाणून घ्या ६ लाख गुन्हेगारांचा डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीबद्दल

मुंबई : सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

गुन्हेगारांची माहिती तत्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी ॲम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

अशी आहे ॲम्बिस प्रणाली

जुन्या व पारंपरिक पद्धतींनी होणाऱ्या कामकाजाची परिभाषा बदलून राज्य पोलीस दलाने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी ‘अॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसेच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.

• जगातील सर्वोत्तम अशी ‘अँम्बिस’ प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

• डोळ्यांचे, हाताच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास मदत

• 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा

• 2600 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण.

• एका क्लिक वर मिळणार आरोपींची सर्व माहिती

• फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाईल स्कॅनरचा वापर

• सी.सी.टी.एन.एस आणि सीसीटीव्ही शी कनेक्टेड

• नवीन सिस्टीम नुसार डिजिटल स्वरूपात साठवले जुने साडेसहा लाख बोटांचे ठसे

• 1435 चान्सप्रिंट्स प्रणाली मध्ये उपलब्ध

• पहिल्याच दिवशी शोधल्या 85 गुन्ह्यांशी संबंधित 118 चान्सप्रिंट्स

‘ॲम्बिस’ प्रणालीची अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे. ‘ॲम्बिस’ प्रणाली आयडेमिया या कंपनीला ही प्रणाली विकसित करण्यात गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. प्राईस वॉटर हाऊस कूपर्स या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

आता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय

विधानसभेची मोर्चेबांधणी : शिवसेना-भाजपमध्ये होणार जागांची अदलाबदल

वाहतुकीचे नियम मोडल्यास होणार किमान चार पट तर कमाल दहापट दंड

सत्तेचा माज : सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली ‘लाइव्ह शो’मध्ये पत्रकाराला बेदम मारहाण