fbpx

आंबेडकरांचे दबावतंत्र;लोकसभेच्या राज्यातील सर्व जागा लढविण्याची केली घोषणा

टीम महाराष्ट्र देशा– वंचित बहुजन आघाडीमुळे आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या महाराष्ट्रातील सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आजवर आला नसून जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागांची चर्चा होणार नाही’ असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. तसंच ‘काँग्रेस जर 12 जागा देणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोर जाऊ,’ असा इशाराही आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला होता.

इतक्या दिवस वाट पाहून देखील जो आधी इशारा दिला होता त्या इशाऱ्याला कृतीची जोड देत आंबेडकरांनी ही मोठी घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळीआंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सगळ्या जागा लढणार असल्याचं सांगितलं.