‘प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘रिपब्लिकन’ विचार संपवतायत’

blank

टीम महाराष्ट्र देशा : वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी वंचित आघाडी उघडून रिपाइचे राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा घणाघात पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ठाणे येथे आज त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कावडे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी स्थापन केली. मात्र त्यात रिपाइला कुठेचं स्थान दिल नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. प्रकाश आंबेडकर यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता. तसेच भाजपचं वंचित आघाडी चालवत आहे, असा देखील टोला त्यांनी लगावला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत प्रकश आंबेडकर यांनी वंचित आघाडी करत मतदारांना युती – आघाडी व्यतिरिक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मतदारांनी देखील या तिसऱ्या पर्यायाला भरघोस प्रतिसाद दिला होता. याचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. तर अप्रत्यक्ष फायदा भाजप युतीला झाला होता. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याची चर्चा सुरु झाली होती. तर प्रकाश आंबेडकर हे भाजपला आतून मिळाले असल्याचा दावा अनेक नेते आणि पक्ष करत आहेत.