आंबेडकरवादी कृती समितीचे मुंडन आंदोलन! पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलेला निर्णय मागे घेण्याची मागणी

औरंगाबाद : आंबेडकरवादी कृती समितीने भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, सोमवारी मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा जातीय दृष्टीकोण ठेवून घेतलेला, निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करत मुंडण आंदोलन केले.

मागासवर्गीयांच्या पदोन्नती बाबतीत दि. ७ मे रोजी शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसताना मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणाऱ्या, शासनाच्या बाबतीत बहुजनांमध्ये असंतोषाची भावना आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण का गरजेचे आहे याची आकडेवारी कोर्टात सादर केलेली नाही. यामुळे शासनाची मागासवर्गीयांच्या बाबतीत उदासिनता दिसून येत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलनाची परवानगी नसतानाही भडकल गेट येथे मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कृती समितीचे सदस्य भडकल गेट येथे जमल्यामुळे, पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तेथे दिसून आला. आंदोलनात किशोर थोरात सुनील वाकेकर अरुण बोर्डे नागराज गायकवाड विजय वाहुळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP