प्रकाश आंबेडकर समर्थकांनी उधळली रामदास आठवलेंची सभा

कोरेगाव भीमा दंगलीवर योग्य भूमिका न घेतल्यामुळे उधळली सभा

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामांतराच्या २४ व्या वर्षा निमित्त आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व रिपाई अध्यक्ष रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे होते. नुकत्याच झालेल्या भीमा कोरेगाव दंगली वरून भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचे नारे देऊन आंबेडकर अनुयायांनी रामदास आठवले यांची सभा उधळून लावली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहिरसभा आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून उधळून लावण्यात आली आहे. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी खुर्च्याची देखील तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. कोरेगाव भीमा दंगलीनंतर रामदास आठवले यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा रोष आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये आहे. याचंच चित्र आज औरंगाबादमध्ये पहायला मिळाल आहे. विद्यापीठ नामांतराच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात हा सर्व गोंधळ झाला आहे. दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा जयजयकार देखील करण्यात आलं आहे. नंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली असून कार्यक्रम पुन्हा सुरळीत सूर झाला आहे.

sabha

You might also like
Comments
Loading...