लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याची आंबेडकरांनी सुरु केली तयारी

उदगीर : काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्यास लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा निर्धार केला असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उदगीर येथे बोलताना दिली. आघाडीला हा सूचक इशारा देताना आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

उदगीर येथे वंचित बहुजन विकास आघाडीची रविवारी दुष्काळ परिषद झाली. आंबेडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांना कुठल्याही निमित्ताने देशात दंगली घडवून आणायच्या आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यात वाद निर्माण करायचा होता़ मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने सरकारचा हेतू ओळखून जनता शांत राहिली. तेव्हा इतर प्रश्नांद्वारे देशात सवर्ण विरुद्ध इतर मागासवर्गीय यांच्यात भांडण लावून येणाºया लोकसभेच्या निवडणुकीत सत्ता संपादनाचा मार्ग सुकर करायचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...