‘आंबेडकरांनी दलित-मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती निर्माण केली’

nitin-gadkari

टीम महाराष्ट्र देशा- मागील पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या विविध योजनांचा लाभ गोरगरीब कुटुंबांना होत आहे. कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी असल्याचे सिद्ध झाले आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोडले.

वाडेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार अँड. संजय धोत्रे यांच्या जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीचा खरपूस समाचार घेतला. केंद्र सरकारने योजनांचा लाभ देताना जातीपातीचे राजकारण केले नाही. ही विरोधकांची पोटदुखी असून, आजही त्यांचा आपसात मेळ नाही. देशाला स्थिर सरकार देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले. यासभेत बोलताना गडकरी यांनी संजय धोत्रे यांच्यावर चांगलीच स्तुतिसुमने उधळली.