अंबाती रायडूच्या निवृत्तीला निवड समितीचं जबाबदार – गौतम गंभीर

टीम महाराष्ट्र देशा :  क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. या निर्णयानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत रायडूच्या निवृत्तीला निवड समितीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूला विश्च्यावचषकात संधी मिळेल अशी शक्यता होती मात्र रायुडूला संधी मिळू शकलेली नाही. शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही रायडूला संघात स्थान न मिळाल्यामुले त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान रायडूच्या निवृतीच्या घोषणे नंतर अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याचदरम्यान गौतम गंभीर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकात निवड समितीने निराश केले आहे. रायडूच्या निवृत्तीलाही निवड समितीच जबाबदार आहे. निवड समितीमध्ये सध्या पाच सदस्य आहेत. पण या पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या एकट्या रायडूच्या नावावर आहेत, असे गौतम गंभीर यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर विश्वकरंडकात शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाली. त्यांच्याजागी रिषभ पंत आणि मयंक अगरवाल यांची निवड करण्यात आली. पण निवड समितीने यावेळी रायडूच्या नावाचा विचारही केला नाही. ही दुर्देवी गोष्ट आहे, असेही गंभीर यांनी म्हंटले.
याचबरोबर जो खेळाडू आयपीएल आणि देशासाठी चांगली कामगिरी करतो. शतके आणि अर्धशतके झळकावतो. त्याचबरोबर तो पूर्णपणे फिट असतो, अशा खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागणे, हे फारच वाईट आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना असल्याचेही गंभीर यांनी म्हंटले.