क्रिकेटपटू अंबाती रायडूकडून ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की

हैदराबाद : क्रिकेटपटू अंबाती रायडू याने हैदराबादमधील एका ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध  झाली आहे . या ध्वनीचित्रफीतीत अंबाती आपल्या गाडी मधून उतरुन ज्येष्ठ नागरिकाजवळ असताना व  दोघातील वादावादीनंतर अंबाती त्यांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे.

काही नागरिक त्यांच्यामधील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे.अंबातीच्या भरधाव गाडी चालवण्यावर या नागरिकाने आक्षेप घेतल्याने त्यांच्यात वाद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...