अंबाती रायुडू बनला बाबा !

Ambati Rayudu

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटात देशातील रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. यामध्ये पण भारतीय संघाचा फलंदाज आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अंबाती रायुडू याने त्याच्या चाहत्यानां एक गोड बातमी दिली आहे. अंबाती रायुडू याच्या घरी नन्ही परी आली आहे. १४ फेब्रुवारी २००९ रोजी अंबाती आणि चेन्नुपली विद्या यांचं लग्न झालं.

अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नुपल्ली विद्या यांना 12 जुलैला कन्यारत्न प्राप्ती झाली. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही गोड बातमी दिली आहे. CSKनं ट्विट केलं की,”आता डॅडी आर्मीकडून तुला ऑफ-फिल्ड धडे शिकून घ्यावे लागतील.”

CSK संघातील सहकारी सुरेश रैना यानंही रायुडूला शुभेच्छा दिल्या. त्यानं लिहिलं की,”अंबाती रायुडू आणि विद्या यांचे अभिनंदन”

दरम्यान , २०१९ विश्वचषकात अंबाती रायुडू भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होता. परंतू एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने रायुडूला वगळून विजय शंकरला संधी दिली. यानंतर नाराज झालेल्या रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. मात्र सिनीअर खेळाडूंनी समजूत काढल्यानंतर रायुडूने आपली निवृत्ती मागे घेतली होती.

आतापर्यंत रायुडूने ५५ वन-डे सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर १६९४ धावा जमा आहेत. २०१४ ते २०१६ या काळात रायुडू फक्त ६ टी-२० सामने खेळला आहे.

रायुडूला ‘या’ देशानं दिली नागरिकत्वाची अन् क्रिकेट खेळण्याची ऑफर

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव यांची प्रकृती गंभीर