fbpx

निवृत्तीच्या निर्णयानंतरही ‘हा’ भारतीय क्रिकेटर खेळतच राहणार!

टीम महाराष्ट्र देशा- नुकतीच भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रायुडूला विश्वचषकात संधी मिळेल अशी शक्यता होती मात्र शिखर धवन व विजय शंकर हे दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही त्याला संघात स्थान न मिळाल्यामुले त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

दरम्यान आता रायडूनं प्रथम श्रेणी क्रिकेट तसेच, आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रायडूनं स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या माहितीनुसार, “मी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत राहणार आहे. तसेच, घरेलु क्रिकेटमध्येही खेळण्याचा माझा विचार आहे. माझ लक्ष्य सध्या फिटनेस आहे. चेन्नईचा संघ तुम्हाला नेहमी चांगली वागणूक देते, तुमचे आनंदानं स्वागत करते”, असे मत व्यक्त केले.

अंबाती रायडूचा जन्म २३ सप्टेंबर १९८५ ला आंध्र प्रदेशातील गुंतूर येथे झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटचे वेड होते पण तो तो २००१ मध्ये प्रकाशझोतात आला. एनसीए मध्ये त्याने उत्कृष्ठ फलंदाजी केली. त्यावेळी तो भारताचा पुढचा सुपरस्टार फलंदाज होईल अस दिग्गज फलंदाजांना खेळाडूंना वाटत होते. पुढे जाऊन त्याने २००४ सालच्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भूषविले.