अंबानींचा मुलगा लॉकडाऊनवर संतप्त, ‘नेते लाखोंच्या जमावासोबत सभा घेतात ते कसे चालते?’

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावरून माजी अब्जाधीश अनिल अंबानींचा मुलगा अनमोल अंबानीने लॉकडाऊनवर संताप व्यक्त केला आहे. अनमोल अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्या, रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स कॅपिटलमध्ये संचालक आहे.

अनमोलने अनेक सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लॉकडाऊनबाबत प्रश्न विचारला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यावसायिक अभिनेते चित्रपटांचे चित्रीकरण करू शकतात, व्यावसायिक खेळाडू रात्री उशिरापर्यंत खेळू शकतात, नेते लाखो लोकांच्या जमावासोबत सभा घेतात. मात्र, तुमचा व्यवसाय वा काम आवश्यक नाही.

अनमोलने एका पोस्टमध्ये नमूद केले की, हे आरोग्यासाठी नव्हे तर नियंत्रणासाठी आहे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रणासाठी. एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, लॉकडाऊन आपल्या समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणा मोडीत काढत आहे. रोजंदारीवरील मजुरापासून स्वयंरोजगार आणि एसएमईपासून रेस्तराँ-ढाबा, फॅशन आणि कपड्यांच्या स्टोअरपर्यंत सर्वांना नुकसान होत आहे. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. लहान दुकाने बंद होत आहे.

महत्वाच्या बातम्या