Share

Ambadas Danve । अंधेरीतून आम्ही निश्चित निवडून येणारच होतो, मात्र…; भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve । मुंबई : मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया-

भाजपने अर्ज माघार घेतला यावर बोलताना दानवे यांनी भाजपाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. भलेही ते आमच्या विरोधात असतील मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतला आहे. आमच्या भगिनी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्वमधून उभ्या आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार याची आम्हाला खात्री होती.

रमेश लटके यांच निधन दुर्दैवी आहे. ते शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. शाखाप्रमुखापासून ते आमदारापर्यंत पोहोचले. ते या परिसरात 24 तास शिवसेनेचं कार्य करत होते. त्यामुळे अंधेरीमध्ये आमची ताकद आहे. आम्ही निश्चित निवडून येणारच होतो. मात्र भाजपाने माघार घेतली हा चांगला निर्णय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया –

भाजपकडून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्व प्रथम मी सर्वांचे आभार मानते, सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी अर्जमागे घेण्याची पत्रं दिली, त्यांनी अर्ज मागे घेतला, प्रत्येकजण म्हणत होते रमेश लटके आमच्यासोबत होते, त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते, त्यामुळे हा निर्णय झाला असावा, असं म्हणत माझ्या पतीचे सर्वच राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्याची पोचपावती मला मिळाली, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ambadas Danve । मुंबई : मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now