मुंबई : काल केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठण्याचे निर्णय घेतला. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशी ही शक्यता वर्तवली जात आहे की, आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाईल. तसेच, दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयोगाच्या या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला एक चॅलेंज केले आहे.
निवडणूक आयोगाने काल जो निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आकलन कशा पद्धतीने करावं. मला असं वाटतं ही यंत्रणा कोणत्या दबावाखाली काम करतेय की काय? अशा पद्धतीचा निर्णय आहे असं वाटायला जागा आहे. शिंदे गटाचा याचसाठी अट्टाहास होता का? असा निश्चितपणे आपल्या सर्वांसमोर प्रश्न आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, भाजपाला कोणताच राजकीय पक्ष नकोय. निवडणूक आयोगाच्या मार्फत भाजपाचा हा कुटील डाव आहे. कारण, जनतेच्या दरबारात तर शिवसेनेला कोणी थांबवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे एक झळाळी प्राप्त झालेलं नेतृत्व महाराष्ट्राच नव्हे तर देशपातळीवर निर्माण झालेलं नेतृत्व आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाशी समोरासमोर लढता येत नसल्याने अशा पद्धतीने पाठीत खंजीर खूपसण्याचं काम हे भाजपाकडून झालेलं दिसतं. एखाद्या गल्लीबोळातील लहान मूल देखील सांगेल की हा निर्णय कशा पद्धतीने झाला असेल.
जी गद्दारांची, खोकेवाल्यांची सेना आहे त्यांनी शिंदेच्या नावावर समोर यावे. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावात शक्ती आहे की गद्दारांच्या नावत शक्ती आहे, हे निश्चित येणाऱ्या काळात महाराष्ट्रच नव्हे तर देशासमोर येईल, असं आव्हान अंबादास दाववे यांनी शिंदे गटाला दिले आहे.
जो निर्णय आला तो निश्चितच वेदनादाई जरी असला तरी शिवसैनिकांनी अशा अनेक वेदना सहन केलेल्या आहेत. अनेक संघर्ष पाहिलेले आहेत. यातूनही शिवसेना पुन्हा एका नव्या झळाळीने काम करेल असा विश्वास आमच्या शिवसैनिकांच्याच नव्हे तर संपूर्ण संघटनेच्या मनात आहे. तयेच, शिवसेनेची एक स्वतंत्र घटना आहे. त्या घटनेप्रमाणे आमदार म्हणजे काही शिवसेना नाही. शिवसेनेचे प्राथमिक सदस्य म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख शिवसेना आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, नेते, उपनेते ही सगळी मिळून शिवसेना आहे. केवळ निवडून आलेले आमदार आणि खासदार म्हणजेच शिवसेना नाही. शिवसेना तर जनता आहे. ही जनता, शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत आहे. निश्चित यातून पुन्हा एक शक्ती शिवसेनेला प्राप्त होईल. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना यश प्राप्त करेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
- Tripling Season 3 | TVF च्या Tripling सिजन 3 चा ट्रेलर रिलीज
- Vijay Shivtare | “शरद पवारांना २०१४ पासून शिवसेना संपवायची होती…”, विजय शिवतारेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
- Apple iPhone 14 Plus | Apple iPhone 14 Plus वर सुरू आहेत बंपर एक्सचेंज ऑफर
- Supriya Sule | “हम बेवफा तो हर गीज नही थे, पर…”, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला
- Shivsena | “देवेंद्रजी, ५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, तुम्ही असं करायला नको होतं”; खैरे संतापले