Share

Ambadas Danve | उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Ambadas Danve | मुंबई : प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठेवणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

याबाबत बोलताना, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनापासून एकत्र येत आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रात वैचारिक पातळी निर्माण केली, असं अंबादास दानवे म्हणाले.

यादरम्यान, या दोघांचेही नातू एकत्र येत असतील, तर राजकारणचं नाही तर यात समाजकारणाकडंही लक्ष दिलं पाहिजे. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र आल्यास हे स्वागतार्ह पाऊल ठरू शकतं, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. यापूर्वीही शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलेली आहे. यात काही जणांनी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास सामाजिक-राजकीय दृष्टीनं चांगलं पाऊल ठरेल, असं देखील दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ambadas Danve | मुंबई : प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठेवणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now