Share

Ambadas Danve | “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते…”; सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अंबादास दानवेंचा टोला 

Ambadas Danve | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी साठी रवाना झाले आहेत. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील ६ आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत (Uday Samant) यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

उदय सामंत यांच्या या दाव्याला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते एकसंघ आहेत, यातच सगळ्या गोष्टी आल्या. त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते एकसंघ नाहीत”, असं दानवे म्हणाले.

यावेळी बोलताना दानवेंनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर देखील भाष्य केलंय. “ज्याच्या त्याच्या आस्थेचा हा विषय आहे. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा, अतीवृष्टीचा प्रश्न आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी २२०० कोटींचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पडून आहे. त्यासाठी उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्र्यांना ही बैठक घेण्यासाठी वेळ नाही. पण देवदर्शनासाठी वेळ आहे. महाराष्ट्रानं हे सगळं बघावं”, असं अंबादास दानवे (Ambadas Danve) यावेळी म्हणाले.

दरम्यान , राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे.  यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली. “मुंबईच्या बाहेर उद्धव ठाकरेंची पहिलीच मोठी सभा आहे. शिवतीर्थावरच्या सभेपेक्षा विराट सभा बुलढाण्यात होणार आहे. या भागात खासदार, आमदारांनी केलेल्या गद्दारीविषयी जनतेच्या मनात संतप्त भावना आहेत”, असं ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ambadas Danve | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी साठी रवाना झाले आहेत. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now