Share

Ambadas Danve | “आम्ही ‘त्या’ गुन्ह्यांना भीक घालत नाही”; अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्ला

Ambadas Danve | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. एकनाथ शिंदे(EKnath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटामधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. तर ठाकरे गट आणि भाजप(BJP) यांच्यामध्येही वेगळ्याच प्रकारचं शाब्दिक युद्ध सुरू असतं. त्याचबरोबर ठाकरे गटातील काही नेत्यांवर खालच्या पातळीच्या टीका केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासगळ्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve)  यांनी राज्य सरकारवर (State Government) सडकून वार केला आहे.

नेमके काय म्हणाले अंबादास दानवे (Ambadas Danve) 

अंबादास दानवे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना ठाकरे गटातील नेत्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत विचारण्यात आले. त्यावर या गुन्ह्यांना भीक घालत, असं म्हणत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हल्लाच केला आहे. आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल आणि त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर शिवसेना या गुन्ह्यांची चिंता करत नाही. असे गुन्हे आमच्यावर अनेकदा दाखल झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांबाबतच्या धोरणाला सरकार तिलांजली देत आहे. 10 ऑक्टोबरपासून शिक्षक आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. या संदर्भात सरकार खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप दानवे यांनी सरकारवर केला आहे.

तसेच, पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असं विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.त्यावर बोलताना दानवे म्हणाले, मंत्र्यांनी जनतेच्या भावनांकडे संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे. मंत्र्यांनी अशा पद्धतीचं बोलणं जनतेच्या भावनेचा अपमान आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ambadas Danve | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. एकनाथ शिंदे(EKnath Shinde) गट आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now