Ambadas Danve | मुंबई : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच वेदांता प्रकल्पाबाबत (Vedanta Foxconn Project) माहिती अधिकाराअंतर्गत काही मुद्दे समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे (Ambadas Danve)
अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत, वेदांता प्रकल्पाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून दाखवला आहे. वेदांता प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दानवे म्हणाले की, सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी माहिती समोर येते, माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधीपासून झाला? त्यामुळे यातील माहिती बनावट आहे. 15 डिसेंबर 2021 ला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला. 5 जानेवारी 2022 ला वेदांताने या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्रासमोर ठेवला. 11 जानेवारीला महाराष्ट्राने महाराष्ट्राने प्रिंसिपल अॅप्रुव्हल महाराष्ट्राने दिला.
तसेच, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे शिंदेसरकारच्या वतीने केले जाणारे दावे आणि माहिती अधिकारातील माहिती चुकीची असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दानवेंनी केलेल्या आरोपांना शिंदे-फडणवीस सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN T20 | बांगलादेशने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- Sheetal Sheth | “खोके सरकार खोटे सरकार”, शीतल शेठ यांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केला पर्दाफाश
- Udhhav Thackeray । “रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच…”; ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल
- Raees Shaikh । “इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा”; रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! संपादकांना जबाबदर ठरवण्याची कोणालाही परवानगी नाही