वॅाल स्ट्रीटमधील कर्मचारी ते जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा मालक.

भावना संचेती– पुस्तक असो वा कोणतीही लहानात लहान  वस्तू असो काहीही हवं असेल तर पटकन हात मोबाईल कडे जातो आणि एका क्लिकवर आपल्याला त्या वस्तूची किमंत कळते.अगदी काही तासात ती वस्तू आपल्या हातात असते.तेही अगदी बाजारपेठतील किंमतीहून कमी.ऑनलाईन शॉपिंग विश्वात एक नाव अगदी विश्वासाने घेतले जाते ते म्हणजे अॅमेझॉन. जगातील सर्वात मोठ्या या शॉपिंग कंपनीची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

आजतागायत जे स्टार्टअप चालू झाले आहेत त्यांच्या यशाच्या कहाण्या फार  रंजक आहेत .ज्या व्यक्तीनी  आज पर्यत स्टार्टअप सुरु केले त्या व्यक्तीनी  मोठ्या कंपनीमधील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून नवीन व्यवसायास सुरुवात केली. अॅमेझॉन च्या संस्थापकच्या बाबतीत ही असेच काही झाले.

जेफरी पी. बेझोस हे अॅमेझॉनचे संस्थापक आहेत. जेफरी १९९४ मध्ये वॅाल स्ट्रीट या कंपनीत काम करत होते. त्यावेळी इंटरनेट जाळे वेगाने पसरत होते. हीच संधी ओळखून जेफरी यांनी स्वताचे स्टार्टअप सुरु करण्याचे ठरविले. काही दिवस इंटरनेट सेवा आणि त्यातील संधीचा अभ्यास केला नंतर जेफरी यांच्या लक्षात आले की ऑनलाइन शॉपिंग सेवेला मोठी मागणी आहे. याकरता  त्यांनी  वॅाल स्ट्रीट मधील नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या नवीन स्टार्टअप ला संपूर्णपणे झोकून देण्याचे ठरविले.

सुरुवातीला जेफरी यांनी  अशा २० वस्तूंची यादी काढली ज्या वस्तूंना बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. सर्वेक्षण केल्यानंतर जेफरी यांच्या असे लक्षात आले की पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. जेफरी यांनी त्यांच्या वेबसाईट वर ऑनलाईन पुस्तके विकण्यास सुरुवात केली.

अॅमेझॉन सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी होण्याचे मुख्य रहस्य म्हणजे घरपोच सुविधा ते ही बाजारपेठेच्या किमंतीपेक्षा कमी भावात या कारणामुळे अॅमेझॉन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. अॅमेझॉन चालू करण्यासाठी जेफरी यांना पैशाची गरज होती. अशा वेळी जेफरी यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आपल्या आयुष्याची सर्व कमाई झेफरी यांच्या स्टार्टअप वर लावली व अशा प्रकारे अॅमेझॉन या शॉपिंग वेबसाईटची सुरुवात झाली.

आज अॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठ्या शॉपिंग वेबसाईट पैकी एक असून,एकेकाळी दुसऱ्याच्या कंपनीत काम करणार जेफरी आज लाखों कर्मचाऱ्यांचा काम देणारा झाला आहे. ३,४१,४०० कर्मचारी  अॅमेझॉनमध्ये काम करतात. अॅमेझॉन च्या या बरोबर १५ इतर कंपन्या देखील आहेत.

जो पर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.माणसामध्ये हट्टीपणा असणे गरजेचे आहे.त्यामुळे माणूस चिवट आणि खंबीर” बनतो-जेफरी पी. बेझोस