अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन

पुणे: राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील (वय ५०) यांचे पुण्यात आज पहाटे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे ते धाकटे बंधू होते. अमरसिंह गेली अनेक वर्षे पुण्यातच वास्तव्यास होते.

सरळ व मनमिळावू स्वभाव आणि मार्गदर्शक रूपात असलेले अमरसिंह सर्वांना ‘काका’ म्हणून परिचित होते. काकांनी तेर गावाचे पाच वर्षे सरपंचपद देखील भूषवले होते. अमरसिंह पाटील काका यांच्या अशा अकाली जाण्याने तेरच्या डॉ.पाटील कुटुंबीय आणि सुनेत्र पवार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Loading...

एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपुरक व्यवसाय देखील केला होता. त्यांचे वाचन दांडगे होते, एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.आज दुपारी त्यांच्या मूळ गावी तेर (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण