अमरनाथ यात्रेवर हल्ल्या करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा

टीम महाराष्ट्र देशा: 10 जुलै रोजी अमरनाथ यात्रेवरील भक्तांच्या बसवर हल्ला केलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्य आणि काश्मीर पोलिसांनी केला आहे. याबद्दलची माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक शेष पॉल वेद यांनी ट्विट करत दिली आहे. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी या कारवाईमध्ये ठार झाले आहेत.

हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईल याआधीच खात्मा केला गेला होता. यानंतर आता करणारे अबू माविया, फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातलं, असं ट्वीट वेद यांनी केलं आहे