देशाला रक्तपिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज – खा. अमर साबळे

Amar-Sable

पुणे : समाजा-समाजामध्ये तेढ वाढवून रक्तपिसासू बनण्यापेक्षा जीवनदाता बनून रक्तदानाचा महायज्ञ चालू ठेवून समाजाची सेवा करणे हीच खरी देशभक्ती असल्याचे, प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी येथे केले. विश्व विवेक फाऊंडेशन आणि नावंदर कुटुंबियांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील संत तुकाराम उद्यानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी खासदार साबळे बोलत होते.साबळे म्हणाले, सद्य परिस्थितीत देशात शांतता, सहिष्णुता वाढीस लागण्यासाठी रक्त पिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज आहे. एकवीस वर्षे कै. अशोक नावंदर यांनी सुरु केलेला रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड असाच पुढे सुरु रहावा. निस्पृहपणे त्यांनी सुरु केलेले समाजकार्य त्यांची पुढची पिढी करीत आहे. नावंदर परिवाराने सुरु केलेली मोफत स्वर्गरथ रुग्ण वाहिका सेवा समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे.