‘हे’ तर संजय काकडेंचं अज्ञान – अमर साबळे

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज भाजपचेच खासदार संजय काकडे यांनी वर्तविला आहे. यंदाची स्थिती ही भाजपसाठी चिंताजनक बनली आहे. दीर्घकाळ सत्तेत असल्याने यंदा भाजपला नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. असा दावा संजय काकडे यांनी ‘पुणे मिरर’ या दैनिकाशी बोलताना केला होता.

दरम्यान, आता संजय काकडे यांच्या या दाव्याचा समाचार भाजपचेच खासदार अमर साबळे यांनी घेतला आहे. गुजरात निवडणुकीबाबत संजय काकडेंचं भाकीत म्हणजे त्याचं गुजरात बाबत असलेल अज्ञान आहे. गुजरात मधील भाजपचे काम, भाजपची बूथ रचना, तसचं मुळ भाजप काय आहे हे संजय काकडेंना काहीही माहिती नसल्याने त्यांनी असा चुकीचा अंदाज वर्तविला आहे. असा प्रतिहल्ला अमर साबळे यांनी संजय काकडे यांच्यावर केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...