Amar Rajurkar । नांदेड : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गट हा वाद सुरु झाला. हा वाद दिवसेंदिवस वाढतच असताना दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. अशातच काॅंग्रेसचे आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) यांनी अब्दुल सत्तार यांना चांगलाच टोला लगावला आहे.
राजूरकर म्हणाले, अब्दुल सत्तार यांची आणि माझी वैयक्तिक मैत्री आहे. आम्ही अनेक वर्ष काॅंग्रेसमध्ये एकत्र काम केले आहे. अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील सत्तार यांनी काम आणि मंत्रीमंडळात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले, सध्या राज्याचे कृषीमंत्री असलेले अब्दुल सत्तार खरतर माझे चांगले मित्र आहेत. अशोक चव्हाण साहेबांशी देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सत्तार मंत्री देखील होते. पण आमच्याकडे होते तेव्हा ते बरे होते, भाजप आणि शिंदेगटात जाऊन ते पुरते बिघडले आहेत. त्यांना देखील खोटं बोलायची सवय लागली आहे असं म्हणत अमर राजूरकर यांनी सत्तारांना चिमटा काढला आहे.
राज्याचे कृषीमंत्री आणि कधीकाळी अशोक चव्हाण यांचे विश्वासू राहिलेले अब्दुल सत्तार यांनीच चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असून ही माहिती आपल्याला त्यांच्याच जवळच्या आमदाराने सांगितल्याचा दावा राजूरकर यांनी केला. अशोक चव्हाणांच्या बाबतीत सत्तार यांनी केलेला दावा हास्यास्पदच म्हणावा लागेल, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis । फडणवीसांनी थेट इलॉन मस्कला केलं रिट्वीट, म्हणाले…
- Sushma Andhare । “ये डर मुझे अच्छा लगा”; सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदे गटाला टोला
- Gulabrao Patil । “उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही” ; गुलाबराव पाटलांचा टोला
- Bachchu Kadu and Ravi Rana | अखेर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटला
- Ravi Rana । झुकुंगा नहीं म्हणत बच्चू कडू यांचं शक्तीप्रदर्शन, रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया