विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास

Chandrakant Patil And Amal Mahadik

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भाषा भाजप सरकारकडून वारंवार करण्यात येते. राज्यात सरकार पडण्याच्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये जोरदार कलगितुरा रंगल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विधान परिषदेसाठी 6 ठिकाणी 10 तारखेला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अमल महाडिक (Amal Mahadik) यांचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

भाजपकडून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. 6 वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत, असं चंद्रकांत पाटील  म्हणाले आहेत.

या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत. नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. 105 भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून 165 सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी 43 मतं यायला काही अडचण येणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं. ती वेळ काही दिवसांची आहे. इतकंच नाही तर विधान परिषद निवडणुकीत कोल्हापुरातून अमल महाडिक यांचाच विजय होणार, असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या