‘मी खरंच इतका वाईट आहे का?’ सतत डावलल्यामुळे कुलदीप यादवने बोलुन दाखवली खंत

मुंबई : आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली जाते. मात्र यादरम्यान कधी कधी अनुभवी खेळाडूना मात्र डावलण्यात येते. असाच अनुभव कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवला आला आहे. याबद्दल त्याने आपली खंत बोलुन दाखवली.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कुलदीप यादवने सतत संघातुन डावलल्याने मनातील निराशा बोलुन दाखवली. यावेळी तो म्हणाला की,’सतत खेळण्याची संधी मिळाली तर आत्मविश्वास वाढतो. मात्र जर संघाबाहेर जास्त वेळ काढावा लागला तर याचे परिणाम उलटे होतात. त्यात कोरोनामुळे गोष्टी अधिकच कठीण होत चालल्या आहेत. बाकावर बसुन राहणे कधीतरी चांगले वाटते मात्र कायम नाही’ असे बोलुन दाखवले. यावेळी बोलताना आयपीएल स्पर्धेबाबत बोलताना तो म्हणाला,’आयपीएल स्पर्धेत मला केकेआरने एकही संधी दिली नाही. तेव्हा मला खरच खुप वाईट वाटले. संघव्यवस्थापन निर्णय घेत असते मात्र हे निर्णय चुकुही शकतात.’ असे तो म्हणाला.

आयपीएल स्पर्धेत चेन्नईच्या खेळपट्टीवर मी उपयोगी ठरलो असतो मात्र तेथेही संघाने मला संधी नाही दिली. यावेळी मला वाटले का मी खरचं इतका वाईट आहे का? एकवेळी भारताचा महत्वाचा फिरकीपटु म्हणून ओळखला जाणारा कुलदीप यादव गेल्या काही काळात पुर्णपणे दुर्लक्षित होत आहे. नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघातही त्याला स्थान देण्यात आलेले नाही. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपासुन कुलदीप यादवकडे निवड समीतीने सतत डाववले आहे. आयपीएल मध्ये चेन्नई येथे झालेल्या सामन्यात खेळपट्टी ही फिरकीपटुना साथ देत होती. मात्र तरीही केकेआरने कुलदीप यादवला बाकावर बसवुन ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP