fbpx

नेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती, पण?- अक्षय कुमार

akshay kumar

नवी दिल्ली : अक्षय कुमार नेहमी सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. त्याचे चित्रपट हि सामाजिक असतात. आता लवकरच त्याचा ‘पॅडमॅन’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार म्हणाला ”नेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती. मात्र तेव्हा मी निर्माता नव्हतो आणि आवश्यक तेवढा पैसाही नव्हता. मात्र आता हे काम करु शकतो. पत्नी ट्विंकल खन्नाने अरुणाचलम मुरुगनाथम यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर दिग्दर्शक आर. बाल्की यांची भेट घेतली आणि सिनेमावर विचार सुरु केला,”

सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळीवर हॉलिवूडमध्येही आतापर्यंत सिनेमा झालेला नाही. लोक नेहमी याविषयी सांगतात, मात्र कुणीही व्यावसायिक सिनेमा बनवत नाहीत, कारण सर्व जण यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आम्ही या दिशेने एक नवं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे,”अक्षय कुमार पॅडमॅन’च्या प्रमोशनदरम्यान बोलत होता.