डॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील

doctor

पुणे : ‘भारती हॉस्‍पीटलमध्‍ये गेल्‍या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. ती व्‍हेंटीलेटरवर होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्‍या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून व्‍हेंटीलेटरवरुन काढून आयसीयूमध्‍ये तिला शिफ्ट करण्‍यात आले आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आणि चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्‍या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.’ अशा शब्दात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारती हॉस्‍पीटलचे अधिष्‍ठाता डॉ. संजय ललवाणी आणि त्‍यांच्‍या चमूचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे.

तसेच, जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्‍टाफ यांच्‍या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी कोरोना बाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील. कोरोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत. ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी कोरोनाबाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील, असेही त्यांनी यावेळी म्हंटले.

दरम्यान, भारती रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा परदेश प्रवासाचा काहीच इतिहास नाही. तसंच तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने परदेशात प्रवास केलेला नव्हता. तरी देखील तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, पुणे जिल्‍ह्यात कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्‍टाफ यांच्‍या समर्पित भावनेने आणि सेवेने रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाणही जास्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.