‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू दिले नाही’

पुणे : माझ्या वेळेस देखील पुण्याचे महापौर, सभागृह नेते यांना विश्वासात घेऊन पाण्याचा निर्णय घेत होतो. माझ्या काळातही दुष्काळ होता. मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू दिले नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही, ही दुर्देवाची बाब असल्याचं सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारला टोला लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असताना पत्रकाराशी संवाद साधला यावेळी नियोजनाच्या मुद्द्यावरून पवार यांनी टीका केली.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

‘पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका. सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे. माझ्या वेळेस देखील पुण्याचे महापौर, सभागृह नेते यांना विश्वासात घेऊन पाण्याचा निर्णय घेत होतो. माझ्या काळातही दुष्काळ होता. मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू दिले नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही, ही दुर्देवाची बाब आहे. अजुन सहा महिने पाणी पुरवायचे आहे. पुण्याला जेवढं गरजेचं तेवढं पाणी द्यावे’.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...