वर्ष झाले तरी अभियांत्रिकीच्या गुणपत्रिका मिळाल्या नाहीत

टीम महाराष्ट्र देशा –  अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची परीक्षा होऊन वर्ष झाले. तरी १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अद्याप मिळालेल्या नाहीत. तशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केलेला होता.निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची ही समस्या आहे. विद्यापीठाकडून गुणपत्रिका आलेल्या नाहीत.

दुसरीकडे विद्यार्थी तक्रार घेऊन विद्यापीठाकडे येणार नाहीत, याची काळजी घेण्याची तंबी विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. अशा वेळी महाविद्यालये काही कारणे सांगून विद्यार्थ्यांची समजूत काढून वेळ मारून नेत आहेत.या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता परीक्षा मंडळ संचालक बी. पी. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या समस्येचे निवेदन कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांना दिले.

त्यावर जिल्हा शहर सचिव अजय देशपांडे, अक्षय आडम यांच्या सह्या आहेत.आंदोलन करावे लागेलकाही इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील टी. ई. शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप एस. ई.च्या चौथ्या सत्राच्या सुधारित गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत. त्यांचे निकाल ऑनलाइन मिळाले आहेत. छापील गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. ही समस्या सुटली नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल – राहुल पाटील, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

You might also like
Comments
Loading...