चिमुकला म्हणतो, राजे तुम्ही असताना आम्हाला कसली अडचण!

UADYAN RAJE

सातारा: खासदार उदयन राजे भोसले हे आपल्या खास स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच त्यांच्या चाहता वर्ग हा सर्व स्तरातील आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत उदयन राजे भोसलेंवर प्रेम करणारे लोक आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याने चालणाऱ्या मुलाने उदयन राजेंना लिफ्ट मागितली होती. त्यामुळे ती घटना चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा उदयन राजेंना गोरगरीब जनतेविषयी असणारे प्रेम दाखवणारा प्रसंग घडला आहे.

काल रविवारी कास भागातील भागांना भेटी देण्यासाठी उदयन राजे गेले असता. त्यांना रस्त्यावर एक छोटा मुलगा व त्याचे वडील किरकोळ काम करत होते त्या निरागस मुलाला पाहुन राजेंनी गाड़ी थांबवाईला सांगितली. त्या मुलाकड़े पाहुन जवळ घ्यायचा मोह त्यांना आवरला नाही. शाळेत जातो का विचारले काही अड़चन आहे का?
असे त्या मुलाला विचारले असता. मुलगा म्हणाला ‘राजे तुम्ही असतांना आम्हाला कसली अडचण’. त्या मुलाचे वडील म्हणाले रोज शाळेत जातो तुम्ही असताना कसली अडचण.

UADAYAN RAJE BHOSALE

 Loading…
Loading...