माझ्या देशाचा तुमच्या राजकारणासाठी वापर करू नका; तायवानच्या महिलेने अल्पेश ठाकोरला झापलं

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी माझ्यासारखेच कृष्णवर्णीय होते, पण आयात केलेले मशरूम खाल्ल्यामुळे मोदी आता गोरे झाले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी खात असलेले हे मशरूम तायवानहून येतात. मोदी दिवसाला पाच मशरूम खातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रुपये आहे. असा दावा गुजरातमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी केला होता.

मात्र, आता तायवानच्या एका महिलेने व्हिडीओ ट्विट करून अल्पेश ठाकोर यांना तोंडावर पाडलय. भाजपचे प्रवक्ता तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

काय म्हणाली महिला…

व्हिडिओमध्ये तायवानच्या महिलेने सांगितले की, मी मेसी जो आहे, मी तायवानची रहिवाशी आहे. मी भारतातील एक बातमी पाहिली. त्यात भारतीय नेता तायवानचा एक असा मशरूम आहे त्याची किंमत १२०० डॉलर आहे. तुम्ही हे मशरूम खाल्ले तर तुम्ही गोरे होता. मी माझ्या देशात अशी कोणतीही गोष्ट ऐकली नसेल हे अशक्य आहे. यासाठी माझ्या देशाचा आपल्या राजकारणासाठी वापर करू नये.