कॉंग्रेसला खिंडार, 6-7 आमदारांसह ओबीसींचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरात अनेक वेगवान अश्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे . तर दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपाला नामोहरम करणाऱ्या गुजरातमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसणार असून आमदार अल्पेश ठाकोर जवळपास 6-7 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. लवकरच अल्पेश ठाकोर याबाबतची घोषणा करणार आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.विधानसभा निवडणुकीत पक्षानं दुर्लक्षित केल्याचा आरोप अल्पेश ठाकूर यांनी केला आहे.Loading…
Loading...