कधीकाळी मोदींचा कट्टर विरोधक असणारा ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपमध्ये

टीम महाराष्ट्र देशा : गुजरातमधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूरआणि आमदार धवलसिंह झाला यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर अल्पेश ठाकूर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकूरआणि आमदार धवलसिंह भाजपात प्रवेश केला आहे.

अनेक दिवस अल्पेश ठाकूर आणि धवलसिंह यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र त्यावेळी अल्पेश ठाकूर यांनी कॉंग्रेसबरोबर राहूनच काम करणार असल्याच जाहीर केल होत. २०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते. या तिन्ही नेत्यांच्या झंझावाती प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा देखील धास्तावले होते. मात्र आता भाजपला त्रासदायक ठरणाऱ्या नेत्यांनीच भाजपची वाट धरली आहे.