बाप्पाच्या विसर्जनासोबत सोन्याच्या मुकुटाचेही झाले विसर्जन, पण…

patil

मुंबई : राज्यात सर्वत्र गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळते. दिड दिवसाच्या गणपती बाप्पाला देखील मोठ्या थाटामाटात निरोप देण्यात आला. परंतु बाप्पाचे विसर्जन करताना वसईतील पाटील कुटुंबाकडून चूक घडली. बाप्पाचे विसर्जन करताना साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकूट हरवला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

बाप्पाचे हा सोन्याचा मुकुट शोधण्यासाठी पाण्यात एकच शोधाशोध सुरु झाली. मात्र १२ तासांच्या  शोधानंतर अखेर हा मुकुट सापडला आणि पुन्हा एकदा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. मात्र घरी सुतक पडल्यानं पाच दिवसांच्या बाप्पाचे दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे या घाई गडबडीमध्ये बाप्पाचं मुकूट देखील पाण्यात विसर्जन झाले होते.

या मुकुटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये इतके होती. १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाप्पाचं मुकूट सापडला. या घटनेनंतर पाटील कुटुंबावर आलेल्या संकट बाप्पाने दूर केल्याचे म्हंटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या