पेट्रोलपाठोपाठ आता CNG आणि PNGच्या किमतीतही वाढ!

मुंबई: देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती यामुळे अनेक वाहन धारक त्रस्त झाले आहेत. महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ होत आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेलमध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. एकीकडे पेट्राल, डिझेलच्या किंमती वाढत असताना CNG आणि PNGच्या  किमतीत देखील वाढ झाली आहे.

महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलो वाढवल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने मंगळवारी सीएनजीच्या किंमतीत 2.28 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीची किंमत 57.54 रुपये प्रतिकिलो इतकी झाली. तर PNGचा भाव 33.93/SCM इतका झाला असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

यामध्ये रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच लाखो ग्राहकांना सीएनजीचा पुरवठा केला जातो तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात. यामुळे नागरिकांना या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या