कोरोनासोबतच डेंग्यू, मलेरियाचीही नागरिकांना धास्ती, पालिका नाचवतेय उपाययोजनांचे कागदी घोडे!

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्याने शहरात साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु औषध फवारणी आवश्‍यक उपाययोजना राबवण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत शहरात डेंग्यूचे ३० संशयित रुग्ण आढळले. मात्र तपासणीत सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून शहरातील बहुतांश भागांत औषध अथवा धुर फवारणी झालेली नसल्याचे चित्र आहे.

यंदा पावसाळ्यात कोरोना सोबतच विविध रोगांना रोखण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे. प्रतिबंधासाठी नियमित औषध फवारणी धूर फवारणी करणे आवश्‍यक आहे. मात्र पालिकेकडून जनजागृतीचे कागदी घोडे नाचवण्याचे चे काम केले जात आहे. मागील काही दिवसांपासून शहरात सर्दी, खोकला, ताप आदिचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती व माशांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवायला हव्यात. वॉर्डा-वॉर्डात औषध फवारणी फवारणी करायला हवी.

मात्र डेंग्यूचा रुग्ण आढळला तर अशा ठिकाणी फवारणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. अबेटिंग नियमित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र पालिकेने कागदोपत्री धूर फवारणी अबेटिंग नियमित होत असल्याचे दाखवले आहे. पालिकेकडून दिले जाणारे सर्वेक्षणाचे आकडे व प्रत्यक्ष उपाययोजना यांत मोठी तफावत असल्याचे दिसते. मागील काही दिवसांपासून शहरात सर्दी, खोकला व तापीचे रुग्ण वाढले आहेत. मात्र या पार्श्‍वभूमीवर पालिकेचा आरोग्य विभाग साथरोग प्रतिबंधाच्या उपाययोजना केवळ मोजक्याच भागांत राबवित असल्याचे दिसतेे. त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्‍त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP