आर्यन सोबत ‘या दोघांना’ ही मिळाला जामीन; उद्या येणार तुरुंगातून बाहेर

आर्यन सोबत ‘या दोघांना’ ही मिळाला जामीन; उद्या येणार तुरुंगातून बाहेर

aryan khan

मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आणि त्याच्या सोबत असणारे इतर ८ जणांना २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याच्याबाजूने युक्तिवाद मांडण्यासाठी वकिलांची फौज त्याच्या जामिनासाठी प्रयत्न करत होती. एनसीबीच्या सत्र न्यायालयाने त्याचा दोन वेळेस जामीन नाकारला होता. त्याच्या विरुद्ध इतर जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. अखेर आज त्याच्या जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला.

त्यामुळे आज आर्यन खान , मुनमुन धमेचा ,अरबाज मर्चंट या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या जामिनाची प्रत उद्या मिळणार असून त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असे जेष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. या प्रकरणात आता तिघांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणात एनसीबीला याचा मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी काल पार पडली.

आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या