औरंगाबाद: ‘सरकारकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक पिळवणुकीला आम्ही वैतागलो आहोत. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस.टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी द्यावी. तसेच आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. व आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना जीवनदान द्यावे, अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी’. अशी मागणी औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) यांना केली आहे.
७ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला काही दिवसातच दोन महिने पूर्ण होतील. या कालावधीत राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे अमिष देखील देण्यात आले. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपला दुखवटा सुरूच ठेवला आहे. न्यायालयाने राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीस इतर संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २१ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र वेळेअभावी सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर २२ डिसेंबरला सुनावणी झाली.
आज (दि.५) पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात स्वेच्छामरणाची परवानगी कर्मचाऱ्यांनी मागितली आहे. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात ८० बसेसच्या ३३७ फेऱ्यांद्वारे ५ हजार ८९५ प्रवाशांनी प्रवास केला. नव्याने रुजू झालेले चालक आणि वाहक यांच्यामुळे फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरीही अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी दुखवट्यात सामील असल्याने संपूर्ण क्षमतेने एसटी सुरू झालेली नाही.
कर्मचारी म्हणतात, आम्ही तणावात..
एसटी महामंडळातील सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. महाराष्ट्रातील इतर शासकिय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही व वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<